Chandrakant Patil : पुण्यात चंद्रकांत पाटील करणार सरकारी ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या सरकारी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे. राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात नारपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव आहे.

 

फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होतील, अशी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.ही यादी पालकमंत्र्यांची नाही तर कोणते मंत्री ध्वजारोहण करतील याची आहे, असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे अजूनही त्यांना फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील,अशी त्यांना आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या जिल्ह्यात शह द्यायचा असेल तर फडणवीसच हवेत, असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटते.

 

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असले तरीही ते कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या सत्ताकाळात ते अखेरच्या वर्षभरासाठी पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. मंत्र्यांचे खातेवाटप तसेच पालकमंत्रीपद निश्चित केले जाईल, त्यावेळी पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री करुन फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील, असे भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी खासगीत बोलत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.