Pune News : राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या त्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले..

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करू नका असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ माजली होती. पुन्हा एखादा राजकीय भूकंप होतो की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. मात्र या विधानावर आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच खुलासा केला आहे. 

चंद्रकांत पाटील आज सकाळीच मानाचा पहिला कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी उपस्थित माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी त्या दिवशी देहू गावात घडलेला किस्सा सांगितला.

ते म्हणाले भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थाटलेल्या सलून च्या उद्घाटनासाठी मी देहू गावात गेलो होतो. तेथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री यांनी पुढे यावे अशी घोषणा सुरू होते. त्यावर मी म्हणालो की “अरे माजी माजी काय म्हणता चार दिवसांनी ते आजी होतील”. मला माजी मंत्री म्हणू नका असे मी म्हणालो नव्हतो.

आणि नेमकी हीच क्लिप कुणीतरी तयार केले आणि फिरवली. आपल्या सामाजिक जीवनात वावरत असताना तुमच्या नावाने काही बिल लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. तशाच महाराष्ट्रात घडल्या. यावर राजकीय चर्चाही झाली. परंतु त्या वक्तव्य मागे माझा इतर कुठलाही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.