Chandrapur: पत्नीच्या चितेवर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न फसला; पतीने अखेर विहिरीत दिला जीव

Chandrapur: Attempted suicide by jumping on wife's funeral pyre; The husband finally gave life to the well किशोरला पत्नीचा विरह सहन झाला नाही. त्याने पत्नीच्या सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

एमपीसी न्यूज- गर्भवती पत्नीचा मृत्यू सहन न झाल्याने भडाग्नी दिल्यानंतर पतीनेही तिच्या चितेत उडी घेतली. त्यावेळी जवळच उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत वाचवले. परंतु, नंतर त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली.

किशोर खाटीक असे आत्महत्या केलेल्या या पतीचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावचा तो रहिवासी होता.

किशोरचे १९ मार्च रोजी रुचिता चित्तावार (१९) हिच्याशी विवाह झाला होता. दोघे चंद्रपूरला राहत होते. चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम तळोधी येथे माहेरी आली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. तिने रविवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.

किशोरला पत्नीचा विरह सहन झाला नाही. त्याने पत्नीच्या सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, तिथे उपस्थित असलेल्या लोकांमुळे त्याचा प्रयत्न फसला. त्याला जखमी अवस्थेत वाचवण्यात आले. पण नंतर त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.