Parandwadi : चंद्रशेखर यांनी देशाला दिलेले योगदान पंतप्रधानपदापेक्षाही मोठे – शरद पवार

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – चंद्रशेखर यांनी देशाला दिलेले योगदान पंतप्रधान पदापेक्षाही मोठे होते, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी परंदवडी येथे व्यक्त केले. 

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. परंदवाडी येथे आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मावळ तालुक्यातील परंदवाडी येथील भारत पद यात्रा केंद्रात डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमास माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमर साबळे, श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, माजी आमदार कृष्णराव भेगडे, विलास लांडे, माऊली दाभाडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके व पदाधिकारी उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले की, चंद्रशेखर यांनी काढलेल्या पायी भारत यात्रेतून पूर्ण भारत देशातील राज्यांची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. आज त्या पदयात्रेला ३७ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांच्या आदर्श विचारांची गरज आज सर्व तरूण पिढी समोर ठेवणे गरजेचे आहे.

यावेळी चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर म्हणाले, भारत पद यात्रा केंद्रात पहिली मूर्ती परंदवडी येथे बसविण्यात आली. त्यामुळे ही पदयात्रा जीवंत ठेवण्यासाठी ज्यांनी काम केले. त्या सर्वांचा आभारी आहे. परंदवडी भारत पद यात्रा केंद्राचे विश्वस्त सुधींद्र भदौरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांच्या हस्ते माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यातून आलेल्या सर्व भारत पद यात्रेतील सदस्यांचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.