Chandrayan-3 News : चांद्रयान – 3 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत अवकाशात सोडले जाण्याची शक्यता – डॉ. जितेंद्र सिंह

एमपीसी न्यूज – चांद्रयान – 3 हे 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी चांद्रयान -3 चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

चांद्रयान -3 च्या तयारीमध्ये साधनांच्या मांडणीला अंतिम रूप देणे, उपप्रणालीची उपलब्धता, एकात्मीकरण, अवकाशयान पातळीची तपशीलवार चाचणी आणि पृथ्वीवर प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष चाचण्यांचा समावेश आहे. कोविड -19 महामारीमुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र लॉकडाउन काळातही घरून करणे शक्य असलेली सर्व कामे करण्यात आली. अनलॉक कालावधी सुरू झाल्यानंतर चांद्रयान -3 चे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आणि ते अंतिम टप्प्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.