PMPML : बाजीराव व शिवाजी रोडवरील पीएमपीएमएलच्या मार्गिकेत उद्यापासून बदल

एमपीसी न्यूज – बाजीराव व शिवाजी रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाकडून ( PMPML) पीएमपीएमएलच्या मार्गीकेत बदल केले आहेत. हे बदल गुरुवार (दि.28) पासून लागू होणार आहेत.

यामध्ये बाजीराव रोड वरील मार्ग क्रमांक दोन स्वारगेट ते शिवाजीनगर हा मार्ग वगळून कात्रज ते शिवाजीनगर, मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, मार्केटयार्ड ते कासारवाडी रेल्वे स्थानक, कात्रज ते पिंपळे गुरव, स्वारगेट ते सांगवी, मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा, कात्रज गुजरवाडी ते चिंचवड गाव या मार्गिकेवरील बस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन रोड अशी जाईल व येताना या बस जंगली महाराज रोडने डेक्कनकडून टिळक मार्गावरून पुढे जातील.

Nigdi : ‘टिफन’ या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा ‘बेस्ट सेल्स अँन्ड मार्केटिंग’ गटात द्वितीय क्रमांक

तर, सहकारनगर ते संगमवाडी, सहकारनगर ते न.ता.वाडी, अप्पर डेपो ते सुतारदरा या बसेस जाताना टिळकरोड, फर्ग्यसन रोड वरून जातील व येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळक मार्गे पुढे जातील. हा बदल गुरुवार म्हणजे उद्यापासून संचलनात आणला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पीएमपीएमएलच्या ( PMPML) वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.