Pune : विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरकडे जाणा-या वाहतुकीत मंगळवारी मध्यरात्रीपासून बदल

एमपीसी न्यूज – विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा जवळील पेरणेफाटा येथील विजय रणस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून तसेच नगररोडवरून अहमदनगरला जाणा-या वाहतुकीत मंगळवारी (दि.31) रात्रीपासून  बदल करण्यात आला आहे.

पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहरातून व पिंपरी-चिंचवड शहराकडून नगररोड वरून अहमदनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी नगररोडवरील खराडी बायपास चौक येथून उजवीकडे वळून हडपसर-सोलापूर रोड-केडगाव-चौफुला मार्गे न्हावरा शिरुर नगररोडवरून अहमदनगरकडे जावे. किंवा येरवडा-विश्रांतवाडी-आळंदी-मरकळ मार्गे शेल पिंपळगाव-शिक्रापूर-नगररोडला जावे.

सासवड, कात्रज बायपास रोडकडून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रोडने मांजरी फाटा-15 नंबर लक्ष्मी कॉलनी चौक पुणे येथून व सातारा रोडवरून येणा-या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गावरून चौफुला मार्गे न्हावरा शिरूर नगररोडवरून अहमदनगरकडे वळवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.