Chandni Chowk Bridge News : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार असल्याने पुणे शहरात वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार असल्याने वाहतुकीत बदल एक ऑक्टोबर रात्री 11:00 वाजे पासून ते 2 ऑक्टोबर  8 वाजेपर्यंत किंवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत असणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबई- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा पूल पाडण्यात येणार असल्याने सदरचे काम करतेवेळी व तेथील राडाराडा उचलण्याची कारवाई होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तिथून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • मुंबई -बंगलुरु राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उसे टोलनाका येथे थांबविण्यात येणार आहे.
  • साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापुर टोल नाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.
  • मुंबई बंगलुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते उर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांचे वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.
  • मुंबई बंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते घोडावत चौक( पिंपरी चिंचवड आयुक्तालय) यादरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.
 पर्यायी मार्ग
 मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चार चाकी वाहन करिता
  • मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चार चाकी वाहने उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती हॉस्पिटल चौक, खंडूजी बाबा चौक टिळक रोडने जेधे चौक, पुणे सतारा रोडने कात्रज चौक सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले फुल डावीकडे वळून मुंबई बंगलुरु राष्ट्रीय महामार्ग.
  • वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरून विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई बंगलोरु राष्ट्रीय महामार्ग.
  • राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडनी विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले डावीकडे वळून मुंबई बंगलूरू राष्ट्रीय महामार्ग.

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चार चाकी वाहनांकरिता पर्यायी मार्ग:

  • खेड शिवापुर टोल नाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चार चाकी वाहनांकरिता 

  • खेड शिवापुर टोल नाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक,  डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक राजीव गांधी पुलावरून वाकड रोडने वाकड चौक डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगलुरू राष्ट्रीय महामार्ग

पुणे मुळशीकडून पुण्यात जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चार चाकी वाहनांकरिता 

  • उडते घोटावडे फाटा इथून हिंजवडी मार्गे पुणे ते मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग
  • पौड ते लवळे फाटा सुस मार्गे पुणे ते मुंबई- बंगलुरू राष्ट्रीय महामार्ग
  • आवडते मोठा मार्गे खडकवासला पुणे ते मुंबई- बंगलुरू राष्ट्रीय महामार्ग
  • डाव्या बाजूने बावधन मार्गे पुणे ते बंगलुरु राष्ट्रीय महामार्ग अशी वळविण्यात येईल.
सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत
1) योग्य तो बंदोबस्त, पेट्रोलिंग करतील.
2) महामार्ग पोलीस पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस संबंधात यांच्या संपर्कात राहून त्या ठिकाणी त्यांची मदत घेतील.
3) जड वाहतूक चालकांना शक्यतो या कालावधीत त्यांची वाहने हॉटेल ढाबा या ठिकाणी पार्किंग करण्याचे सूचना देण्यात येतील.
4) नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.