Pune News : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

एमपीसी न्यूज – शहरात शुक्रवारी दहीहंडीचा सण आहे.संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहत हा सण साजरा केला जातो. शहरातही मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने नागरिक हा सण साजरा करतात.शहरात मोठ्या संख्येने दहीहंडी फोडली जाते.पुणे शहरातील मुख्य भागात अनेक मंडळाच्या दहीहंडी असतात.या सोहळ्याला संपूर्ण शहरातील नागरिक हजेरी लावत असतात. 

शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी पाचपासून दहीहंडी फुटेपर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक (बाबु गेनू चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इ. ठिकाणी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. यावेळी या वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक विभागाकडून वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीत करण्यात आलेले बदल

  • शिवाजी रोडवरुन स्वारगेटला जाणा-या वाहन चालकांसाठी स.गो.बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने/शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.
  • पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणा-या वाहन चालकांसाठी पुरम चौकातून टिळक रोडने – अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी.रोडने इच्छितस्थळी जातील. तसेच पुरम चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील.

  • स.गो.बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे शिवाजी रोडने जाणारे वाहन चालकांसाठी स.गो.बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने – झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
  • बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येवून आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
  • रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असुन पर्यायी मार्गाचा वापर करावा.
  • सोन्या मारुती चौकाकडुन लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळुन फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.

सदर भागातील वाहतूक परिस्थिती नुसार आवश्यकते प्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. तरी वाहनचालकांनी सायंकाळी पाच ते दहीहंडी फुटेपर्यंत उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करुन, वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.