Khadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज-खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल केले असल्याचे राहुल श्रीरामे पोलीस आयुक्त वाहतूक पुणे शहर यांनी कळविले आहे.
पुणे शहरातील खडकी वाहतूक विभागाचे हद्दीतील चर्च चौक अंडरपास येथे मेट्रोचे गर्डर लॉचींगचे काम करण्यात येणार असल्याने सदर कामास अडथळा होऊ नये याकरता चर्च चौक अंडरपास व पोल्ट्री अंडरपास येथे पुढील प्रमाणे वाहतूक वळविण्यात येत आहे.
साई चौकातून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना चर्च अंडरपासकडे येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यांनी पर्यायी मार्ग म्हणजे साई चौक इथून उजवीकडून वळून रेंज हिल्स रोडने मिल्ट्री हॉस्पिटल- सिंफनी सर्कल

– डावीकडे वळून पोल्ट्री अंडरपास किंवा सरळ रेंजर्स कॉर्नर – पुढे शिवाजीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे.
पुण्याकडून आमचे दिशेने येणारी व आठवा रोडने व्यंजितकडे जाणारी वाहने यांना पोल्ट्री अंडरपासकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
त्यांनी पर्यायी मार्ग म्हणजे पोल्ट्री चौकातून सरळ चर्च चौक – चर्च अंडरपास डावीकडे वळून केंद्रीय विद्यालय उजवीकडे साई चौक- आंबेडकर चौक- औंध कडे किंवा चर्च अंडरपास – डावीकडे वळून केंद्रीय विद्यालय मार्गे पुढे सिम्फनी सर्कल- रेंज हिल्स कॉर्नर शिवाजीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.