Hinjawadi : नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करत भूमकर चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – हिंजवडी मधील भूमकर चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा प्रायोगीक तत्वावर सुरु ठेवण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे 26 ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात जमा कराव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

भूमकर चौकात करण्यात आलेले बदल –

# हिंजवडी गावातून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वाळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन काळा खडक येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे

# डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वाळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन मारुंजी वाय जंक्शन येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे

# शनी मंदिर ते भूमकर चौक हा सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) हा दुहेरी मार्ग करण्यात येत आहे.

# सयाजी हॉटेल ते भूमकर चौक हा सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) हा दुहेरी मार्ग करण्यात येत आहे.

# मायकार शोरूम येथून भूमकर चौकात येणा-या वाहनांना उजवीकडे वाळण्यास व सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी डावीकडे वळून मारुंजी वाय जंक्शन येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.