Pimpri News : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  : अनधिकृत बांधकाम करणा-यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मंगळवारी (दि. 1) पिंपरी पोलीस ठाण्यात सात, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी), वेदांतम राघवन (रा. खराळवाडी, पिंपरी), सुनील भिला गलांडे (रा. नेहरूनगर, पिंपरी), महेश गजानन पाटील (रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी), प्रकाश गणपत कालापुरे (रा. खराळवाडी, पिंपरी), अंबादास उत्तरेश्वर गाढवे (रा. नेहरुनगर, पिंपरी), अमोल मनोहर चव्हाण (रा. अजमेरा, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अर्चना सतीश पाटील (रा. काळेवाडी, वाकड), राहुल अनंता कुंभारकर (रा. काळेवाडी, वाकड), शोभा मारुती नाईक (रा. काळेवाडी, वाकड) या तिघांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विष्णू शंकर मरुडकर, विजय केशवराव महामुणकर, अविनाश रघुनाथ करणे (तिघे रा. आदर्शनगर, किवळे) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनधिकृत बांधकाम केल्यानंतर महापालिकेकडून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र पालिकेच्या नोटिसांच्या आदेशानुसार संबंधितांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही. याबाबत प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.