Brigadier Suicide Case : लष्करातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुन्हा वानवडी पोलीसात वर्ग

एमपीसी न्यूज : लष्करातील ब्रिगेडियर असणाऱ्या अनंत कुमार नाईक (वय 58) यांनी 18 एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना अनंत नाईक यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी लष्करातील चार वरिष्ठ अधिकारी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

मेजर बलप्रीत कौर, मेजर निलेस पटेल, लेफ्टनंट कर्नल कुशागारा आणि ब्रिगेडियर ए के श्रीवास्तव यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक अनंत कुमार नाईक (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.

मृत्युपूर्वी अनंतकुमार यांनी लिहून ठेवलेले सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या सुसाइट नोटमध्ये वर नमूद केलेल्या आरोपींनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास आता वानवडी पोलिसांकडे देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.