Chakan Crime News : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीराजांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकण येथील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस याप्रकरणी आणखी तपास करीत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत खैरनार या व्यक्तीने त्यांच्या पत्नीवर संशय घेत “तुझे बाहेर कोणाशी तरी संबंध आहेत” असे म्हणून शिवीगाळ केली. या संशयामुळे खैरनार यांनी याआधी पत्नीस मारहाण सुद्धा केली आहे.

Ashadi Wari 2022 : महापालिका दिंडी प्रमुखांना देणार प्रथमोपचार पेटी भेट

वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून फिर्यादी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे फिर्यादी यांनी चाकण पोलिस ठाणे गाठून पतीराजांविरोधात फिर्याद दिली.

याप्रकरणी आरोपी पती हेमंत खैरनार वितोधात चाकण पोलिस ठाण्यात भा. द. वि कलम 498(अ), 306, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.