Pune News : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दुबई येथे सुरु असणाऱ्या आयपीए सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. शिरूर येथे ही कारवाई करण्यात आली. सुरज अभय गुगळे, अदित्य दिलीप ठाकुर आणि प्रकाश जोशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बेंगलोर व हैद्राबाद यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन  ट्वेंटी-ट्वेंटी या सामन्यावर शिरूर येथील सी.टी. बोरा कॉलेज शेजारील मैदानात हा सट्टा सूरु होता. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी मोबाईल फोनतंत्राचा बेटींग जुगार करीता गैरवापर केला.

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.