Charholi : विरोधात साक्ष देऊ नये म्हणून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आपल्याविरोधात साक्ष देऊ नये म्हणून एकावर कोयत्याने वार केले. डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना च-होली बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_II

गोरख श्रीरंग पठारे असे जबर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गोरख यांची आई सुंदरबाई श्रीरंग पठारे (वय 55, रा. कोतवालवाडी, च-होली बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू एकनाथ धनवडे (वय 26), राहुल एकनाथ धनवडे (वय 21, दोघे रा. कोतवालवाडी, च-होली बुद्रुक) आणि एका अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी राजू व राहुल धनवडे यांच्याविरोधात 2017 मध्ये पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गोरख साक्षीदार होते. याप्रकरणात गोरख यांनी साक्ष देऊ नये म्हणून आरोपी त्यांच्यावर खुन्नस धरून होते. त्याच कारणावरून आरोपींनी संगनमत केले. गोरख त्यांच्या घरासमोर थांबले असता आरोपी तेथे आले. त्यांनी गोरख यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच गोरख यांच्या डोक्यात दगडाने मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करून त्यांना गंभीर जखमी केले, अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1