Charholi News : पाणीपुरवठा योजनेबाबत काही नेते खोट बोलून श्रेय घेत आहेत – रोहित पवार

एमपीसी न्यूज : जलजीवन मिशन महाराष्ट्र प्राधिकरण अंतर्गत ग्रामपंचायत चऱ्होली,मरकळ,वडगांव घेनंद व गोलेगाव-पिंपळगाव या गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या (Charholi News) हस्ते पगडे वस्ती जवळ पार पडला.यावेळी आमदार रोहित पवार यांनी या योजने बद्दल माहिती देत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या योजनेला केलेले सहकार्य तसेच खेड तालुका आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी या योजनेबाबत केलेला पाठपुराव्यांची संबंधीत माहिती दिली.

आमदार रोहित पवार म्हणाले कि, काही नेते योजनेबाबत खोट बोलून श्रेय घेत आहेत. आधीच त्यांचे पाय चिखलात  अडकले आहेत .जेवढे ते खोट बोलतील त्यांच्या त्या खोट्याला येथील सर्व सामान्य जनता बघून ते अजून त्या खोट्याला किती खोल चिखलात गाडता येईल याचाच विचार सामान्य जनता करेल. तसेच शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलताना कांदे दर,लाईट बील ,हमीभाव इ. याबाबतीत त्यांनी राज्यसरकार वर टीका केली.

तसेच पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आदित्य ठाकरे व अजित पवार यांनी लक्ष घातले होते.जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या मार्फत इंद्रायणी नदीत दूषित पाणी सोडले जाते.त्यामुळे इंद्रायणी नदी दूषित होते.यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज आहे. (Charholi News) त्याचा आराखडा सुध्दा बनवला गेला.त्याबाबत अजून ही काम झाले नाही.तरी आपल्याला इंद्रायणी नदी स्वच्छ कशी होईल याबत प्रयत्न करायला हवेत. वारकरी संप्रदायाची मागणी आहे की इंद्रायणी परिक्रमा सुरू केली पाहिजे.लाखो भाविक इंद्रायणी परिक्रमेला आल्या नंतर अध्यात्म, धर्म हा विषय तर म्हत्वाचाच आहे पण याच्यामुळे आपल्या लोकांना काम मिळेल,भाविकांच्या रहाण्याची,भोजनाची व्यवस्था करावी लागेल. यामुळे युवकांना टुरिझम च्या अंतर्गत काम देता येईल.

तसेच यावेळी ते म्हणाले राज्यपालांनी महापुरुषांबद्दल जे वादग्रस्त व्यक्तव्य केले त्याबद्दल त्यांचा हा कार्यक्रम अगोदरच करायला हवा होता. त्या व्यक्तव्या बद्दल तुम्ही आम्ही सर्वांनी विरोध केला.तो महाराष्ट्र भर झाला.भाजप मध्ये असणारी लोक,शिंदे गटा मध्ये असणारी लोक ,नेते यांनी त्याबाबत विरोध केला का? तुकोबाराया बद्दल जे बोले त्यांचा विरोध त्यांनी केला का?असे प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले.

Uddhav Thackeray : हिंमत असेल तर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

महाराष्ट्र जनतेतून त्याबद्दल जो विरोध झाला त्याचा तणाव ,पुढील निवडणूक जोखीम याचा विचार करत त्या महाशयांना बाहेर काढले. आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी सर्व प्रथम  सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण अंतर्गत प्रादेशीक नळ पाणी पुरवठा योजना किंमत  119 कोटी 32 लाख 70 हजार  रु.

याबाबत माहिती दिली. त्यानंतर दिलीप मोहिते पाटील म्हणाले, 4 महिन्या पूर्वी दुर्दैवाने सरकार गेले.त्याचा अगोदर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात फार मोठं योगदान त्यांनी दिल आहे.जलजीवन मिशनची योजना आली त्याबद्दल अजित पवारांनी आम्हा सर्वांना बोलवलं.

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची योजना आहे.त्याचा तेथे आराखडा तयार केला.आता तालुक्यात सुरू झाले आहे ,आम्ही केलेल्या कामाची चंद्रकांत पाटील यांना पत्र देताच याला मंजुरी दिली. कोणत्याही कामाची प्रक्रिया एका दिवसात होत नाही.यासाठी दोन वर्षांचा कालखंड गेला आहे. (Charholi News) यासाठी आराखडे तयार करणे, परवानग्या घेणं,पाणीपुरवठा कोठून कसा करावा याचे नियोजन केले गेले. गाव पातळी ते केंद्र शासन पातळी पर्यंतच्या मंजुरी बाबत त्याचा विविध पातळी मधून प्रवास झाला आहे. तसेच त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण बाबत माहिती दिली.मागील भाजप सरकारच्या काळात भामा आसखेड धरणा बाबत लोकांच्या जमिनी घेतल्या.

देवेंद्र फडवणीस यांच्या निर्णयामुळे पुणे व पिंपरी चिंचवड यांना पाणी मिळाले परंतु शेतकऱ्यांना थेंब भर सुद्धा पाणी ठेवले नाही. यावेळी खेड तालुक्याचा विचार अजिबात केला नाही. धरण आमच्याकडे,पुनर्वसन आमच्याकडे त्रास आम्हाला नदीला थेंब भर पाणी ठेवणार नाही,आमच्या तालुक्याला पाणी प्यायला देणार नाही हा किती अन्याय? आपल्याला पाणी शिल्लक राहिले नाही.शेवटी जाधव वाडीतील धरणातून,सुंदर परिसरातून आपण पाणी आणार आहोत.धरणासाठी तालुक्यातील लोकांच्या जमिनी गेल्या .त्यांना त्रास झाला.या खेड तालुक्यात धरणे किती झाली?त्याचे पाणी तालुक्याच्या किती वाट्याला आले?पाणी तालुक्या बाहेर किती गेले?यावेळी त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले.

आळंदीतील सर्व सुधारणा तिर्थविकास आराखड्यातून झाल्या आहेत.त्या तीर्थक्षेत्र आराखड्यात आहेत.त्याचे प्रमुख आयुक्तांना केले. त्यावेळी आळंदीकरांचे म्हणे होते सर्व आमच्या ताब्यात द्या.परंतु सरकारी अधिकाऱ्यांना जे आधिकार असतात ते लोकप्रतिनिधी नसतात.आडवा आडवी झाली असती. काही करता आलं नसत.त्यामुळे आयुक्तांकडे दिले.अजून ही विविध कामे चालू आहेत.आळंदी मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. तत्कालीन मंडळींनी थोडा फार विरोध केला.हातातून योजना घालवली.आता भामा आसखेड चे पाणी आणणे किती अवघड आहे याची जाणीव झाली.हक्काच्या पाण्या करिता भीक मागण्यासाठी जावे लागले.ते कधी बंद पडतील सांगता येत नाही.त्यांची योजना खेड तालुक्यातील आहे याचे भान ठेवले पाहिजे.आळंदीला पाणीपुरवठा करून पुणेकरांनी ते कर्तव्य पार पाडले पाहिजे.

चऱ्होली,मरकळ, वडगांव घेनंद व गोलगाव-पिंपळगाव यांना हे मुख्य जलवाहिनीतून पाणी येणार आहे. तसेच केळगाव ,धानुरे ,सोळू या गावांना सुद्धा पाणी यातून देता येईल अश्या प्रकारची व्यवस्था करा.अधिकाऱ्यांना सांगितले आहे.सध्या चऱ्होली हद्दीतील आळंदी ग्रामीण भागाला सुध्दा यातून (Charholi News) पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे तेथील आळंदीकरांचे  पाण्या संदर्भातील संकट दूर होणार आहे.तसेच अदाणी बाबत केंद्र सरकार वर टीका करून गॅस ,महागाई ,विजतोड सर्वसामान्य लोकांसह शेतकऱ्यांच्या समस्या याबाबत त्यांनी प्रश्न येथे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलताई पानसरे, तालुका सभापती अरुणशेठ चौधरी व विविध संस्था व  पदाधिकारी  राजाराम लोखंडे,डी डी भोसले पा. बबनराव कुऱ्हाडे पा. रामदास ठाकूर,अनिल बाबा राक्षे, रामशेठ गावडे,बाळासाहेब ठाकूर,दीपालीताई काळे,चऱ्होली सरपंच आशा थोरवे,वडगांव घेनंद सरपंच शशिकला घेनंद,गोलेगाव-पिंपळगाव सरपंच अमित चौधरी,मरकळ सरपंच अमोल लोखंडे ,प्रकाश कुऱ्हाडे पा. अनिकेत कुऱ्हाडे पा.,पांडुरंग थोरवे, वैशालीताई जाधव,संध्या जाधव,वैशाली गव्हाणे इ.अनेक यावेळी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.