Charholi Crime News: चऱ्होली येथून दोन दलालांना अटक करत महिलेची सुटका

एमपीसी न्यूज – महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी चाऱ्होली खुर्द (Charholi Crime News) येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली.
जितेंद्र सुनील चौधरी (वय 24, रा. भोसरी), महिला (वय 34, रा. भोसरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित 28 वर्षीय महिलेला पैशांचे आमिष दाखवले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चऱ्होली खुर्द येथील (Charholi Crime News) एका लॉजवर कारवाई करून महिलेची वेश्याव्यवसायातून सुटका केली. तसेच दोन दलालांना 79 हजार 530 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.