Charholi : रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने रेडझोन बाधित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. वडमुखवाडीतील पाच अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मधील वडमुखवाडीमधील काही भाग रेडझोनच्या हद्दीत येत आहे. या रेडझोनच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली. त्यामध्ये पाच बांधकामे पाडण्यात आली. 3565 चौरस फुट क्षेत्रफळावर बांधकाम पाडण्यात आले आहे.

पोकलेन, महापालिका कर्मचा-यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. सोमवारी झालेल्या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.