Garbage depot fire : चऱ्होली खुर्द येथील गायरानातील कचरा डेपोला समाजकंटकाद्वारे आग

एमपीसी न्यूज : चऱ्होली खुर्द येथील  गायरान जमिनीवर ग्रामपंचायत द्वारे निर्माण करण्यात आलेल्या कचऱ्या डेपोला काही समाजकंटकाद्वारे गुरूवारी दि.3 रोजी सायंकाळच्या वेळी आग लावण्यात आल्याने त्या रात्री मोठ्या प्रमाणात तेथून धूर निघाला. (Garbage depot fire) तेथील धुरामुळे कचरा डेपो शेजारी काही अंतरावर असलेल्या त्याच गायरानात नियती फाउंडेशन मातोश्री वृद्धाश्रमात(पत्रा शेड मध्ये) राहत असलेल्या नागरिकांना रात्री धुराचा त्रास झाला.या धुरामुळे 23 जणांना उपचारासाठी रूग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.

चऱ्होली खुर्द येथील गायरानातील कचरा डेपोला समाजकंटकाद्वारे आग लावण्यात आली. या धुरामुळे अनेक नागरिकांना खोकल्याचा,श्वसनाचा,घसा याबाबत समस्या उदभवल्याने त्याच रात्री रुग्णवाहिकेत आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्या रात्री 3 रुग्ण वाय सी एम रुग्णालयात हलवले होते. (Garbage depot fire) त्यात ह्दयरोग,गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती असा समावेश होता.त्यांची प्रकृती स्थिर झाल्या नंतर सकाळी दि.4 रोजी परत आळंदी ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. त्या आश्रमातील एकूण 23 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून 8 रुग्ण निरक्षणाखाली स्थिर असून 15 उपचार घेत आहेत.

Today’s Horoscope 5 November 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याबाबत माहिती आळंदी ग्रामीण अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.शुक्रवारी आळंदी कार्तिकी यात्रा पूर्व नियोजन बैठकी वेळी नियती शिंदे यांनी त्या संबंधित आधिकारी यांना त्याबाबत निवेदन दिले.(Garbage depot fire) या बैठकी दरम्यान डी डी भोसले पा. यांनी सांगितले पालिके मध्ये पूर्वी असलेले  ठेक्केदार पवार हे त्या ग्रामपंचायती वर ठेक्केदार म्हणून सध्या आहेत.याबाबत माहिती त्या बैठकीत त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.