Charholi : चऱ्होली खुर्द येथे आयोजित भव्य बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांची प्रचंड गर्दी

एमपीसी न्यूज : चऱ्होली खुर्द येथे श्री शकुंबरवली बाबांच्या ,मुक्ताई मातेच्या ,रोकडोबा महाराज उत्सवा निमित्त, आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सभापती  रामदास ठाकूर पा.यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन दि.27 ते 31 पर्यँत करण्यात आले. (Charholi) आज दुपार नंतर बैलगाड्यांचा अंतिम सामना होत असल्याने गाडा शौकिनांनी सकाळ पासूनच घाटावरती बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे.

Talegaon Dabhade : ऐतिहासिक श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न

या शर्यतीत एक महिंद्रा थार,दोन टॅक्टर,एक बुलेट ,20 टुव्हिलर,4 जुंपते गाडे अश्या बक्षिसांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकास दोन लाख एक हजार रु., द्वितीय क्रमांकास एक लाख (Charholi) ऐकावन्न हजार रु.तृतीय क्रमांक एक लाख एक हजार रु.चतुर्थ क्रमांकास ऐकावन्न हजार रु.अशी रोख रक्कमेची बक्षिसे आहेत. घाटाचा राजा  4 दिवस 4 टु व्हीलर या बक्षिसंचा ही समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.