Charholi : इंद्रायणी जल प्रदूषण मुक्तीसाठी अजित पवारांना निवेदन

एमपीसी न्यूज – आज (दि.2 जून)  यांच्या ( Charholi ) निवासस्थानी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली.  एका उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी चऱ्होलीत त्यांचे आगमन झाले होते. यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पदाधिकारी शिरीष कारेकर,दिनेश कुऱ्हाडे यांनी इंद्रायणी जल प्रदूषण मुक्ती संदर्भातील निवेदन त्यांना दिले.त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत इंद्रायणी जल प्रदूषण  संदर्भात बैठक बोलवाण्यास सांगितली.

Pimpri : भाटनगरमधून दोन किलो गांजा जप्त

इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पदाधिकारी दि.1 मे महाराष्ट्र दिनी साखळी उपोषणाला बसले होते. पाच दिवस साखळी उपोषण चालले होते, या उपोषणाची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी यांनी येत्या दहा दिवसांत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व संबंधितांची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन देऊन साखळी उपोषण सोडण्यात आले होते. दिलेल्या कालावधीत संबंधित बैठक  बोलवली नाही. या संदर्भात त्यांनी अजित पवारांना माहिती दिली.

इंद्रायणी सेवा फौउंडेशनच्या वतीने दि.26 मे रोजी जिल्हा आधिकारी यांना इंद्रायणी प्रदूषण मुक्ती संदर्भातील निवेदन ( Charholi ) देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.