Charholi News : चऱ्होली येथे राष्ट्रवादी चिन्ह घड्याळाचे रोहित पवार यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज : जलजीवन मिशन महाराष्ट्र प्राधिकरण अंतर्गत ग्रामपंचायत चऱ्होली,मरकळ,वडगांव घेनंद व गोलेगाव-पिंपळगाव या गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या (Charholi News) हस्ते पगडे वस्ती जवळ पार पडला. यावेळी रोहित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाचे अनावरण करण्यात आले.

चऱ्होली ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी संचालक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे इच्छुक उमेदवार अनिकेत कुऱ्हाडे पा. आमदार रोहित पवार ,आमदार दिलीप आण्णा मोहिते पा.तालुका  सभापती अरुणशेठ चौधरी,रामदास ठाकूर,विलास कातोरे,दादा इंगवले, नवनाथ होले, अनिल राक्षे,विनायक घुमटकर, अरुण चांभोरे, बबनराव कुऱ्हाडे ,वैशाली जाधव ,निर्मला ताई पानसरे ,दिपाली काळे, कैलास सांडभोर यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाचे अनावरण करण्यात आले.

Pune News : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने आनंदोत्सव साजरा

तसेच यावेळी चऱ्होली खुर्द ,मरकळ,गोलेगाव-पिंपळगाव ,वडगांव घेनंद च्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आमदार रोहित पवार व आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना यावेळी संत ज्ञानेश्वरांची मूर्ती,विठ्ठल रुक्मिणी मूर्ती , पगडी,शाल,श्रीफळ देण्यात आले. कामाचा पाठपुरावा करणारे अरुणशेठ चौधरी यांचा विशेष सत्कार दोन्ही आमदारांच्या तर्फे करण्यात आला.

यावेळी सरपंच आशा थोरवे ,उपसरपंच पांडुरंग थोरवे,ग्रामपंचायत सदस्य रवी कुऱ्हाडे, पूजा थोरवे,पूजा ठाकर, अश्विनी थोरवे,रामदास घोलप, राहुल भोसले, सुवर्णा भांगर, (Charholi News) अर्चना थोरवे,तुकाराम केवळ, शालन पगडे,स्वप्नाली पगडे,निखिल थोरवे व इतर मान्यवर उपस्थित होते.याबाबत ची माहिती अनिकेत कुऱ्हाडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.