Charholi : मारहाण करत महिलेचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. महिलेचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी बाराच्या सुमारास च-होली येथे घडली.

शिवराम तुकाराम मगर (वय 48, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. त्याने महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडा ओरडा करून विरोध केला असता आरोपीने त्यांना मारहाण केली. पीडित महिला आणि आरोपी यांचे भांडण सुरु असताना महिलेचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला. आरोपीने मुलाला देखील लाथाबुक्य्यांनी मारहाण करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सागर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.