Charholi : किड्स पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

एमपीसी न्यूज- श्री.पांडुरंग आप्पाजी काळे ट्रस्ट संचालित पॅराडाइज इंटरनॅशनल स्कूल व किड्स पॅराडाइज स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त विज्ञान प्रदर्शन सायन्स प्रदर्शन तसेच सी.बी.एस.सी. मधील प्रायमरी व प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ई – डॅक थेटर ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना स्वःत शिक्षकाच्या भूमिकेत माहिती दिली. प्रायमरी स्कूलमध्ये ‘सायन्स डे ‘निमित्त सायन्स प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार, जे.सी.बी, शेतीची अवजारे यांच्या प्रतीकृती तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे शिक्षक आणि उपस्थित पालकांनी कौतुक केले.

यावेळी शाळेचे अध्यक्ष ऍड अनंत काळे, उपाध्यक्ष कुंदा काळे, प्रज्ञा काळे, मुख्याध्यापिका स्वाती काळे, संस्थेचे खजिनदार ऍड सचिन काळे, मानवी हक्क संरक्षण आणि.जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, क्रीडाशिक्षक संदेश साकोरे, ज्योती मँडम, हर्षाली मँडम व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.