Charholi news : चऱ्होलीत आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्त ‘मूकपद यात्रा’

एमपीसी न्यूज – प्रतिवर्षी प्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी (Charholi news)  महाराज यांच्या 334 व्या पुण्यतिथी निमित्त वेताळबुवा चौक, बैलगाडा घाटाजवळ, च-होली बुद्रुक येथे आज (दि 21 मार्च) धर्मवीर मूकपद यात्रेचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, च-होली च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

 

 

धर्मवीर छञपती श्री संभाजी महाराज बलिदान दिन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने गेले 38  वर्षीही हा उपक्रम राबवला जात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च-होली बु मध्ये 2016 साला पासुन गेले 8 वर्ष धर्मवीर मूकपद यात्रेचे आयोजन केले जात आहेत. गेले महिनाभर च-होली बुद्रुक मधील काळीभिंत (दत्तनगर), तनिष ऑर्चीड सोसायटी, पठारे मळा, काळजेवाडी, तापकीर वस्ती, वडमुखवाडी,भोसले वस्ती थोरल्या पादुका मंदिर, श्री राम मंदिर च-होली  गावठाण या ठिकाणी बलिदान मास पाळण्यात येत आहे.

 

Charholi news : चऱ्होलीत आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्त ‘मूकपद यात्रा’

 

 

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी देव,देश आणि धर्माच्या रक्षणासाठी छळ सहन करून आपले बलिदान दिले.  त्याच शंभूछत्रपतींच्या पवित्र देहाचे ज्वलज्वलंत तेजस प्रतीक म्हणून तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी (Charholi news) केलेल्या बलिदानास श्रद्धांजली वाहण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या काळी न निघालेल्या अंत्य यात्रेचे स्मरण म्हणून निघणार्‍या मूकपद यात्रेत सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आणि माता भगिनींनी आपले आद्य धर्म कर्तव्य म्हणुन उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, च-होली बु च्या वतीने करण्यात आले आहे.

 

तत्पूर्वी काल दि. 20 मार्च  सायंकाळी 5 वाजता वढू बुद्रुक येथून निघालेली धर्मवीर ज्वाला (मशाल) शौर्यपीठ तुळापुर मार्गे च-होली बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती आणि ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिर येथे मशालीचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

 

धर्मवीर मूकपद यात्रेचा मार्ग प्रारंभ स्थळ

श्री वेताळबुवा चौक च-होली बु येथून प्रारंभ होऊन खोलेश्वर आळी मार्गे, नवनाथ आळी मार्गे,धर्मनाथ आळी मार्गे कुंभार वाडा मार्गे सावता माळ आळी मार्गे बाजार पेठ मार्गे हनुमान मंदिर मार्गे  भोसले वस्ती मार्गे पुन्हा प्रारंभ स्थळी येऊन धर्मवीर छञपती श्री संभाजी महाराजांना अग्नी डाग दिला जाईल. त्यानंतर ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेऊन शंभुराजेंना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांनी पादत्राणे घालू नयेत,असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,च-होली बुद्रुक च्या (Charholi news) संयोजकांच्या वतीने कळविले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.