Charholi News : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी विनायक भोंगाळे

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा विभाग अध्यक्षपदी विनायक पंढरीनाथ भोंगाळे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी सर्वानुमते ही निवड केली. भोंगाळे यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी दिले. यावेळी राजकीय समन्वयक डॉ. खुशालचंद बोपचे उपस्थित होते.

यावेळी बोलताना विनायक भोंगाळे म्हणाले, “ओबीसी समाजाच्या व्यापकतेने सर्व क्षेत्रात विकास करणे, विविध शासन योजनांचा लाभ समाज बांधवांपर्यंत पोहोचविणे, ओबीसी समाजाला राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे तसेच समाजाचे संघटन करणे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य ध्येय आहे. महासंघाच्या भूमिकेशी व नियमांशी एकनिष्ठ राहून समाज हिताच्या दिशेने काम करणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.