Charholi news: वडमुखवाडीत रेडझोनमधील अनधिकृत बांधकामांवर आज पुन्हा कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. इ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत मौजे वडमुखवाडीतील रेडझोनमधील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) पुन्हा हातोडा चालवत अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले.

कारवाईमध्ये एकूण 39 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. एकूण क्षेत्रफळ अंदाजे 39167 चौरस फुट बांधकामावर कारवाई करण्यात आली. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरू केली आहे.

अनधिकृत बांधकामे भुईसपाट केले जात आहेत. चिखली, जाधववाडी, च-होली, वडमुखवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे.

प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या नियत्रंणाखाली उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहिते, सुधीर मोरे तसेच 5 कनिष्ठ अभियंता व एकूण 15 बीट ऑफीसर यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, प्रकाश जाधव, 3 पीएसआय व 42 पोलीस कर्मचारी तसेच आरसीपीचे 23 कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

कारवाईसाठी 3 पोकलेन, 5 जेसीबी, 25 मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.