Charholi : जलतरण तलाव शनिवारपासून सुरू होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वडमुखवाडी, च-होली येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव हा नागरिकांसाठी सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे.(Charholi) हा जलतरण तलाव नागरिकांना पोहण्यासाठी शनिवार पासून सुरु करण्यात येत आहे.

वडमुखवाडी, च-होली येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज या जलतरण तलावाचा नागरिकांनी लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या  www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर इतर 7 तलावाप्रमाणेच Online Booking करावी लागणार आहे. या जलतरण तलावाच्या बॅचेसच्या वेळा राहतील.
Chinchwad : सरोवर प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी 

सकाळच्या सत्रात 6 ते 6.45, 7 ते 7.45, 8 ते 8.45 आणि 9 ते 9.45 ही बॅच महिलांसाठी राखीव असेल. तर, दुपारच्या सत्रात 2.30 ते 3.15 ही  बॅच महिलांसाठी राखीव असणार आहे.(Charholi) दुपारी 3.30 ते 4.15, 4.30 ते 5.15 आणि सायंकाळी 5.30 ते 6.15 अशा बॅच राहतील. साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवशी जलतरण तलाव नागरिकांसाठी बंद राहतील. याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.