Youth arrested: शस्त्र बाळगणाऱ्या तरुणास चऱ्होलीतून अटक

एमपीसी न्यूज : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. (Youth arrested) त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 7) दुपारी भोसले वस्ती,होली बुद्रुक येथे करण्यात आली.

रोहन बाबासाहेब थोरे (वय २२, रा. भोसले वस्ती, च-होली बुद्रुक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाजी जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Snooker Competition: स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा 2022 !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विनापरवाना बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता जवळ बाळगला. (Youth arrested) याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून 90 रुपये किमतीचा कोयता जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.