Charholi : बेकरी टाकण्याच्या बहाण्याने महिलेची सव्वा तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- बेकरी सुरू करून देतो असे सांगत महिलेची (Charholi ) तब्बल सव्वातीन लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार चऱ्होली येथे 26 जून 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत घडला.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली असून पोलिसांनी जिया उल अन्सारी (वय 35 रा. पिंपरी) याच्या विरोधात फसवणुकीचा पुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : ताबा दिलेल्या फ्लॅटचे खोटे दस्त करत काढले कर्ज, दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेत वेळोवेळी फोन करून केक अ लॉक या नावाने बेकरी टाकण्याचे आमिष दाखवले. बेकरी सुरू करण्यासाठी आरोपीने फिर्यादी कडून रोख व चेक द्वारे तीन लाख 25 हजार रुपये घेत बेकरीचे ॲग्रीमेंट करतो असे सांगितले.

मात्र अद्याप कोणतेही ॲग्रीमेंट न करता परस्पर पैशांचा अपहार केला .यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Charholi )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.