Jewellery Theft: चऱ्होली येथे कारमधून चार तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : चऱ्होली येथे पार्क केलेल्या कारमधील बॅगेतून चार तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत.ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली. (Jewellery Theft) याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime : पिंपरीत कोयत्याने मारहाण व गाड्यांची तोडफोड करत टोळक्याची दहशत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कारमध्ये दागिन्यांची बॅग होती. (Jewellery Theft) या बॅगेतील 37.5 ग्रॅम सोन्याची नेकलेस व 3 ग्रॅमचे कानातले असे एकूण एक लाख 50 हजार रुपयांचे 4 तोळ्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दिघी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.