Bhosari News : प्रेमाची मागणी करत तरुणीचा पाठलाग

एमपीसी न्यूज – वयाने 12 वर्ष लहान असलेल्या तरुणीचा 36 वर्षीय व्यक्तीने प्रेमाची मागणी करत पाठलाग केला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिच्याकडे लग्नाची (Bhosari News) मागणी करून विनयभंग केला. ही घटना ऑगस्ट 2021 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडली.

मार्तंड भीमराव पवार (वय 36, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : तळेगावमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एकदिवसीय रक्तदान शिबिर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, अशी मागणी करत मार्तंड याने फिर्यादी तरुणीचा पाठलाग केला.(Bhosari News) फिर्यादीला रस्त्यात अडवून प्रेमास होकार देईपर्यंत हात सोडणार नाही, असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.