Chaskaman : चासकमान धरणात लुप्त झालेले जुने वाडा गाव दृष्टिक्षेपात

एमपीसी न्यूज : –  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे जुने वाडा गाव अनेकांच्या आठवणींना आजही तितकाच उजाळा देते. चासकमान धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले जुने वाडा गाव धरणाची पाणीपातळी घटल्याने दृष्टिक्षेपात आले . (Chaskaman) धरणाच्या पाण्यात एरव्ही लुप्त झालेली मंदिरे पाण्याची पातळी कमी झाल्याने आता पुन्हा एकदा दिसू लागली आहेत.

अनेकांच्या आठवणी यामुळे उजळल्या आहेत. वाडा व परिसरातील तसेच गावातील विस्थापित झालेले नागरिक आजही आपल्या आठवणी साठवण्याकरिता जुन्या वाडा गावाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आपल्या पिढीला आठवणी सांगत असतात. चासकमान धरणाच्या बांधकामास 1978 साली सुरुवात झाली. त्यानंतर जुने वाडा गाव विस्थापित होण्यास सुरुवात झाली. अनेक जण बाहेरगावी गेले, तर काही जवळच नवीन वाडा गावात प्रस्थापित झाले. तेथे स्थायिक झाले. चासकमान धरणात 1994 साली पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यानंतर जुने वाडा गाव पाण्यात(Chaskaman)लुप्त झाले.

Alandi:भागवत एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने 30 वर्षांनंतरच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गावातील भव्य पुरातन दगडी बांधकामातील श्रीशिव महादेवाचे मंदिर आजही सुस्थितीत आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share