Alandi News : सोशल मीडियावरून चॅट करत तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्येस प्रवृत्त केले

नंतर बदनामीची भीती घालून पैशांची मागणी करत केले आत्महत्येस प्रवृत्त; महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावरून चॅट करत एका महिलेने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नातेवाईक व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. यामुळे तरुणाने आत्महत्या केली. याबाबत एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता (प्रिया) राजेंद्र देशमुख (रा. कोयाळी बापदेव वस्ती, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आकाश दादाभाऊ पोकळे (वय 20, रा. कोयाळी, बापदेव वस्ती, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मयत तरुण आकाश याची बहीण हर्षदा योगेश कोळेकर (वय 22, रा. कोयाळी, खिरपाड वस्ती, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 18 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत कोयाळी, खिरपाड वस्ती येथे घडली आहे. मयत आकाश याचे लग्न झाले नव्हते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी संगीता हिने त्याच्याशी फेसबुक या सोशल मीडियावरून चॅटिंग केली. आकाशला गोडगोड बोलून त्याला प्रेमाची भूरळ घातली. आकाश सोबत प्रेमसंबंध निर्माण करून त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपी संगीता हिने आकाशकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नातेवाईक व समाजात बदनामी करण्याची धमकी देत त्याला मानसिक त्रास दिला. त्यातूनच आकाश याने आत्महत्या केली. पोलिसांनी संगीताच्या विऱोधात गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.