Chatushringi Crime : “माझा भाऊ आत्ताच जेलमधून सुटलाय”, म्हणत टोळक्याचा धुडगूस, तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या (Chatushringi Crime) हद्दीत नऊ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड केली आणि कोयत्याने आणि दारूच्या बाटलीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रात्री हा प्रकार घडला.

अजय विटकर, विजय विटकर, सिद्धार्थ गायकवाड, अतुल धोत्रे, विजय उर्फ चपाती विटकर, कृष्णा उर्फ किची, सागर धोत्रे, दत्ता धोत्रे आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक विश्वास चिंचकर यांनी फिर्याद दिली आहे.

Har Company Tiranga : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे ‘हर कंपनी तिरंगा’ अभियान राबविणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (Chatushringi Crime) फिर्यादी हे जनवाडी परिसरात काही मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ गायकवाड आणि फिर्यादी यांचे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून पूर्वी भांडण झाले होते. याच कारणावरून सर्व आरोपी फिर्यादी यांच्या घरात घुसले. घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि आरोपी अजय विटकर यांनी हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. तसेच, आरोपी विजय विटकर याने “आम्ही इथले भाई, माझा भाऊ आत्ताच जेलमधून सुटलाय, आमचा नाद करायचा नाय, नाद केला की खल्लास करतो” असे म्हणून हातातील कोयता हवेत फिरून परिसरात दहशत निर्माण केली.

दरम्यान तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पाच आरोपींना अटकही केली आहे. यातील तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.