Pune : पालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत मुलीला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 मार्च 2018 ते 26 एप्रिल 2018 या कालावधीत घडली. एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी याचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्या मुलीला पुणे महानगरपालिकेत लिपीक पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दिले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी साडेतीन लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी लावून न दिल्याने फिर्यादींनी ही रकम परत मागितली असता बँकेच्या खात्यात पुरेशी रकम नसतानाही त्यांना धनादेश देऊन त्यांची फसवणूक केली.

फिर्यादींच्या तक्रारीनुसार आरोपी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.