Pune : दुकान मालकाचे नाव सांगून तरूणाची केली 80 हजारांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – दुकानमालकाचे नाव सांगून किराणा दुकानाची 80 हजारांची रोकड बॅंकेत भरण्यासाठी गेलेल्या तरूणाची फसवणुक केल्याची घटना 13 डिसेंबरला रमणबाग चौक, केळकर रोड येथील जनता सहकारी बॅंक लि. येथे घडली.याप्रकरणी विष्णु देवासे (वय 22) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णु देवासे हा तरूण श्रीओम सुपर मार्केट या किराणा दुकानाची 80 हजारांची रोकड रमणबाग चौकातील जनता सहकारी बॅंक लि. येथे गेले होते.  दरम्यान तेथे एक अनोळखी इसम विष्णु जवळ आला आणि त्याने ती रोकड दुकानमालकाने मला भरायला सांगितली आहे असे  खोटे सांगून फिर्यादीजवळील 80 हजार घेऊन त्यांची फसवणुक केली.याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.