Hinjawadi : लेह लडाख सहलीच्या नावाखाली फसवणूक

एमपीसी न्यूज – सहलीचे नियोजन करून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून ते 5 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

श्रुती राहुल गऊळकर (वय 27 रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोव्हर्स ऑफ हिमालया टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे संचालक गुरुप्रीत सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2019 ते 5 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला मनाली, लेह, लडाख, कारगिल, श्रीनगर येथे जाण्यासाठी सहलीचे नियोजन करून देतो असे सांगितले. त्यासाठी आरोपीने 57 हजार रुपये पेटीएमद्वारे ऑनलाइन घेतले. त्यानंतर सहलीला न नेता तसेच पैसे परत न करता फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.