Chakan : कंत्राट घेऊन काम न करता कंपनीची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – काच बसविण्याचे कंत्राट घेऊन काचा न बसवता कंपनीची साडेपाच लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीकडून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाणेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीज या कंपनीत 5 जून 2018 रोजी घडली.

गणेश मदनलाल गोलेचा (वय 31, रा. श्रीराम सोसायटी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीकांत भाऊराव ठाकूर (रा. वारजे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण नाणेकरवाडी येथे भवानी इंडस्ट्रीज प्रा. ली. ही कंपनी आहे. या कंपनीच्या बांधकामाला बाहेरील बाजूला काचेचे डिझाईन बसवण्यासाठी कंपनीकडून पीओ ऑर्डर काढण्यात आली. ती ऑर्डर आरोपी श्रीकांत याने घेतली. सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी 5 लाख 65 95 रुएये घेतले. पैसे घेऊन मुदतीत काम पूर्ण न करता गणेश यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.