Pune : डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – फोनवरून डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांना फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 4 सप्टेंबर 2018 ते 21 जानेवारी 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी हे कॅप जेमिनी हिंजवडी या कंपनीत कामाला आहेत. त्यांच्याकडे स्टेट बँक व स्टॅण्डर्ड चार्टर बँकेचे डेबिट कार्ड आहेत. फिर्यादी यांना एका इसमाने स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगितले तर अन्य एका महिलेने ती स्टॅण्डर्ड चार्टर बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बँक डेबीट कार्डची चेकींग करीत आहे असे सांगून फिर्यादी यांच्याकडून दोन्ही बँकेच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन तसेच ओटीपी घेऊन फिर्यादीच्या दोन्ही बँकेतून एकूण 2 लाख 6 हजार 998 रुपये काढून घेतले.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिसांनी दोन इसम व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.