Nigdi : बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेतील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आकुर्डी येथील बॅसीन कॅथॉलिक कॉ-ऑप बँक येथे 17 डिसेंबर ते 19 जानेवारी या दरम्यान घडला. याप्रकरणी मंगळवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

शाखा व्यव्यस्थापक जॉन्सन घोन्सालो अल्मेडा (रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कौशिक चटर्जी (रा. लोहगाव, पुणे) या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चटर्जी हा आकुर्डी येथील बॅसीन कॅथॉलिक कॉ- ऑप बँकेत नोकरीला आहे. त्याच्याकडे कर्ज वाटपाचे कोणतेही अधिकार नसताना त्याने खातेदारांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने खातेदारांकडून 88 हजार 200 रुपये उकळले. खातेदारांची दिशाभूल करण्यासाठी त्याने बँकेचे शिक्के आणि फिर्यादी अल्मेडा यांची बनावट सही देखील केली. ही बाब अल्मेडा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना सांगितले. बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून चौकशी झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.