Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Pimple Saudagar) पोलिसांनी छापा मारून एकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी शिवार चौक, पिंपळे सौदागर येथील ‘योग द स्पा’ या ठिकाणी करण्यात आली.

 

निवृत्ती प्रकाश पाटील (वय 26, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालक मालकाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : मावळमधील विकासकामांसाठी 350 कोटी रुपये मंजूर; आमदार शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निवृत्ती पाटील याने स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्याने उपजीविका भागवली. स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.