Chennai : तामिळ न्यूज चॅनलचे 25 पत्रकार कोरोनाबाधित; लाईव्ह बुलेटिन मध्येच थांबवले

एमपीसी न्यूज – मुंबईनंतर आता चेन्नईमध्येही एका चॅनलचे 25 पत्रकार करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झाले आहे. यामुळे चॅनलला आपलं लाईव्ह बुलेटिनही मध्येच थांबवावं लागलं.

कोरोना संक्रमणाचं प्रमाण देशात वाढतानाच दिसतंय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून अनेक लोक करोना विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या बातम्या आपल्याला पाहायला, वाचायला किंवा ऐकायला मिळत आहेत. परंतु, या बातम्या देणारे पत्रकारीही करोनाच्या जाळ्यात अलगद ओढले जात असल्याचं समोर येतंय.

काल मुंबईत 50 हून अधिक पत्रकार कोरोनाबाधित असल्याचं समोर आल्यानंतर आज चेन्नईमध्येही काही पत्रकार कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झाले आहे.

एका तामिळ न्यूज चॅनलमध्ये काम करणारे 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. यामध्ये, पत्रकार, कॅमेरा पर्सन आणि इतर टेक्निकल स्टाफचाही समावेश आहे.या न्यूज चॅनलच्या जवळपास 94 जणांनी कोरोना चाचणी केली.

कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या चॅनलला आपलं लाईव्ह बुलेटिनही मध्येच थांबवावं लागलं. कोरोनाबाधित पत्रकार सापडल्यानंतर चॅनलमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईत 53 पत्रकारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सर्व ठिकाणी पत्रकारांची चाचणी करण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. दिल्ली मध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.