Chennai: लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं खासदाराचं प्यायलं होतं विष, खासदाराचं निधन

एमपीसी न्यूज -लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील (Chennai)उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खासदाराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या खासदाराने स्वत:ला संपवण्याचारविवारी प्रयत्न केला. यात (Chennai)बचावलेल्या खासदारावर दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. एमडीएमकेचे खासदार ए गणेश मूर्ती यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं.

गणेशमूर्ती यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार,  गणेशमूर्ती यांनी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. सल्फास हे किटकनाशक त्यांनी प्राशन केलं होतं. यामुळे अत्यवस्थ झालेल्या गणेशमूर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना सोमवारपासून व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.

Amol Kolhe: अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवनेरी किल्यावर भेट

ए गणेशमूर्ती यांच्या पक्षाने सांगितलं की, गणेशमूर्ती यांच्या जागी डीएमके युवा विंगचे नेते ई प्रकाश यांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे.गणेशमूर्ती यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकिट न मिळाल्याने गणेशमूर्ती तणावात होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत गणेशमूर्ती यांनी  विजय मिळवला होता. त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी एआयडीएमकेचे जी मणिमारन यांचा पराभव केला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.