Pune : राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड

एमपीसी न्यूज – अनेक दिवसांपासून सुरु असलेला पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्षपदाचा शोध अखेर आज संपला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक गटनेते चेतन तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची निवड केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते, सर्वप्रथम नगरसेवक दीपक मानकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, मध्यंतरी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने नवीन चेहऱ्याचा शोध घेण्यात येत होता. माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक सुभाष जगताप यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.
दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदाची निवड अधिकच लांबली होती, त्यामुळे खासदार वंदना चव्हाण यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते असेही सांगण्यात आले. मात्र, अखेर चेतन तुपे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागळात पोहचवण्याचे काम मी करेल अशी निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया चेतन तुपे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.