NADA Notice: जडेजा, के एल राहुल, आणि पुजारासह पाच खेळाडूंना ‘नाडा’ची नोटीस

Cheteshwar Pujara, Ravindra Jadeja get NADA notice, BCCI cites ‘password glitch’ BCCI च्या केंद्रीय करारात समावेश असलेल्या या पाच क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती न दिल्याबद्दल नाडाने नोटीस दिली आहे. हे पाच खेळाडू जे NRTPच्या 110 खेळाडूंमध्ये आहेत.

एमपीसी न्यूज- देशात लॉकडाऊन असताना BCCI ने पाच क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल नाडाने संबंधित खेळाडूंना नोटीस बजावली आहे. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा या पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे.

BCCI च्या केंद्रीय करारात समावेश असलेल्या या पाच क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती न दिल्याबद्दल नाडाने नोटीस दिली आहे. हे पाच खेळाडू जे NRTPच्या 110 खेळाडूंमध्ये आहेत.

BCCI ने या खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती दिली नसल्याने स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, BCCI ने पासवर्डमध्ये गोंधळ झाल्यामुळे ही माहिती दिली गेली नसल्याचे कारण दिले आहे.

नाडाचे महानिर्देशक नवीन अग्रवाल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, या पाच खेळाडूंच्या ठिकाणांची माहिती देण्यास BCCI असमर्थ राहिल्याने आम्ही ही नोटीस पाठवली आहे.

डोपिंग विरोधी सॉफ्टवेअरमध्ये फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यानुसार खेळाडू स्वत: फॉर्म भरू शकतात किंवा त्यांची संघटना ते काम करू शकते.

काही खेळाडू सुशिक्षित नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते त्यामुळे संघटनांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न देण्याची चूक तीन वेळा केली तर खेळाडूवर दोन वर्षाची बंदी घातली जाऊ शकते.

तात्काळ हा प्रश्न मिटवण्यात आला असून यावर BCCI बरोबर चर्चा केली जाणार आहे. जर BCCI माहिती देण्यास असमर्थ ठरल्यास ही तीन पैकी पहिली चूक मानली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.