-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पुणे महापालिका पुरंदर किल्ल्यावर साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प

  महापालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांचा निधी   

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प साकारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी महापालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.  

शहराजवळील सिंहगडावर सन २०१७ साली शूरवीर तानाजी मालुसरे यांचे भिंतीशिल्प बसविण्यात आले आहे. या कामासाठी पुणे महापालिकेच्या २५ लाखाची तरतूद केली होती. याच धर्तीवर पुरंदर किल्ल्यावर स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे यांचे शिल्प साकारण्याचा व त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्याचा प्रस्ताव नगरसेविका अर्चना पाटील यांनी स्थायी‌ समितीला दिला होता. या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे पुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ रोजी झाला. छत्रपती श्री संभाजी महाराज हे शूरवीर तर होतेच पण संस्कृतभाषा निपुणही होते. छत्रपती श्री संभाजी महाराज हे अतिशय प्रजाहितदक्ष होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन अनेक मोहिमा त्यांनी यशस्वीपणे राबविल्या.

संभाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य हे त्यांचे विशेष गुण होते. अशा महापराक्रमी महापुरुषांचे शिल्प पुरंदर किल्ल्यावर म्हणजेच त्यांचे जन्म स्थळी उभारल्यास त्यांचे प्रती ही खरी मानवंदना ठरेल. असे नगरसेविका पाटील यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn