Pimpri :  जनतेच्या हितासाठी झटणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – प्रा.  नितीन बानगुडे पाटील

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन वर्ग या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महापौर उषा  उर्फ माई ढोरे उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्या चे नियोजन राजमाता जिजाऊ यांनी केले. स्वराज्यासाठी एक स्त्री  काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. एक उत्तम, चारित्र्य संपन्न, मुत्सद्दी व जनतेच्या हितासाठी झटणारा व झगडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे गौरव उद्गार शिव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील  यांनी या कार्यक्रम प्रसंगी काढले.

चिंचवड येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन वर्ग या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. या येळी उप महापौर तुषार हिंगे, अ- प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर , नागरसदस्या मंगला कदम, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

आई, राजमाता जिजाऊ या विषयावर बोलताना पाटील पुढे म्हणाले ज्या छ. शिवाजी महाराजांना जिजाऊ नी घडवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी असे सैन्य आणि आरमार उभी केली ज्याचा अभ्यास १५६ देश करत आहेत.हे व्यवस्थापन राजमाता जिजाऊ यांच्या मनातून निर्माण झाले असल्याचे त्यांनी  म्हंटले. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून स्वराज्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या रूपाने एक महापुरुष मिळाल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.