Nigdi News : स्वा. सावरकर मंडळाच्या वतीने एक मेपासून छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने एक मेपासून छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने प्रसिद्ध व अभ्यासू वक्ते फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेचे हे 37 वे वर्ष आहे.

एक ते पाच मे दरम्यान रोज सायंकाळी सात वाजता फेसबुक व युट्यूब वरून ऑनलाईन पध्दतीने या कार्यक्रमात सहभागी होता येईल. एक मे रोजी प्रसिद्ध कायदेतज्ञ व अभ्यासक ॲड. नितीन आपटे ‘समान नागरी कायदा’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

स्वा. सावरकर चरित्र अभ्यासक व लेखक अक्षय जोग ‘स्वा. सावरकर परिचित-अपरिचित’ या विषयावर दोन रोजी मार्गदर्शन करतील. तीन मे रोजी आर एस एस महाराष्ट्र प्रांत पर्यावरण गतिविधि सहसंयोजक विवेक देशपांडे ‘पर्यावरण व हिंदू तत्त्वज्ञान’ या विषयावर आपले विचार मांडतील.

‘कोरोना काळातील कुटूंबाचे मनःस्वास्थ्य’ या विषयावर मानसशास्त्रज्ञ वनिता पटवर्धन चार मे रोजी मार्गदर्शन करतील. आणि पाच मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे ‘परिक्षा न देता पास होणार विद्यार्थी’ या विषयावर आपले विचार मांडतील. जास्तीत जास्त नागरिकांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वा. सावरकर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

फेसबुक / युट्यूब लिंक

 

https://www.facebook.com/savarkarmandalnigadipune

 

https://w.w.w.youtube.com/evyakhyanmala

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.